नमस्कार फाउंडेशन च्या वतीने शहरवासीयांना मोफत सांस्कृतिक मेजवानी – सुहास जोशी

0
4

मधुमेह व सांधेदुखी मुक्त शहर अभियान अंतर्गत मार्गदर्शन, तपासणी व उपचार

दि.२८(पीसीबी)- नमस्कार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने “नमस्कार महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत बुधवार, दि. ३ डिसेंबर ते रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमांचे व आरोग्य विषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आकुर्डी, प्राधिकरण, महापौर निवास, नियोजित जागा येथे आयोजित केलेल्या या महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन, हिंदी, मराठी चित्रपटातील गाण्याचा कार्यक्रम, “करून गेलो गाव हे नाटक”, ‘हास्ययात्रा’ आणि ‘हसवणूक’ हे एकपात्री प्रयोग आणि ”हीच खरी फॅमिली ची गंमत आहे” या दर्जेदार नाटकांची व सांस्कृतिक कार्यक्रमांची मोफत मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे, या वर्षीच्या महोत्सवासाठी अनुप मोरे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती नमस्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत सलीम शिकलगार, अतुल भोंडवे, रमेश कस्तुरे, प्रीतमराणी शिंदे, सीमा हिमने, चंद्रशेखर जोशी, आण्णा हिंगे, मुन्ना बेग, सुनीता खुणे, सचिन सोनवणे, मनोज देशमुख आदी संयोजन समितीतील सदस्य उपस्थित होते.सुहास जोशी यांनी सांगितले की, नमस्कार फाउंडेशन या संस्थेची स्थापना २००३ मध्ये झाली. पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोवा येथे मधुमेह व सांधेदुखी मुक्ती साठी अभियान राबवित आहे. त्या अंतर्गत पहिला नमस्कार महोत्सव २००६ मध्ये आयोजित केला होता.

यावर्षी नमस्कार महोत्सवात बुधवारी (दि. ३ डिसेंबर) सायं. ७ वाजता, ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेलन, रात्री ८ वाजता, “इंद्रधनु” हा निगडी येथील शब्दरंग, कला, साहित्य कट्टा या संस्थेचा कार्यक्रम होणार आहे.गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) सायं. ६:३० वाजता, “म्युझिकल मेलडी” हा सुरेल गीतांचा कार्यक्रम आणि त्यानंतर रात्री ८:३० वाजता, शरद जाधव यांचा “हास्ययात्रा” हा एकपात्री प्रयोग होईल.शुक्रवारी (दि.५ डिसेंबर) सायं. ७ वाजता, ज्येष्ठ दिग्दर्शक व कलाकार महेश वामन मांजरेकर यांनी सादर केलेले प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असलेले “करून गेलो गाव” हे हास्याचे फवारे उडविणारे नाटक होणार आहे.
शनिवारी (दि. ६ डिसेंबर) रात्री ८:३० वाजता, प्रसिद्ध कलाकार अजितकुमार कोष्टी यांचा क्षणोक्षणी हास्याची कारंजी उडविणारा बहारदार “हसवणूक” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

तसेच नमस्कार महोत्सवाचा समारोप रविवारी (दि. ७ डिसेंबर) सायं. ७ वाजता, संपूर्ण कुटुंबाला कौटुंबिक मनोरंजन देणारे लेखक, दिग्दर्शक संतोष पवार यांचे “हीच खरी फॅमिली ची गंमत आहे” कौटुंबिक नाटकाने होईल. यामध्ये सागर कारंडे आणि संतोष पवार या प्रसिद्ध कलाकारांसह शलाका पवार, हर्षदा कर्वे, प्रतीक पाद्ये, विनिषा कुळकर्णी, राकेश शालिनी यांनी देखील भूमिका केल्या आहेत.तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या ठिकाणी पाचही दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मधुमेह व सांधेदुखी मुक्त शहर अभियान अंतर्गत आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. त्याच बरोबर डिजिटल पद्धतीने तरंग यंत्राद्वारे
नाडी तपासणी, कांस्य थाळी मसाज, ॲक्युप्रेशर, मधुमेह, रक्तदाब तपासणी, उपचार व मार्गदर्शन या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मनोरंजनासाठी फन फेअर आणि रोज लकी ड्रॉ विजेत्याला बक्षीस देण्यात येणार आहे अशी ही माहिती संस्थेचे अध्यक्ष सुहास जोशी यांनी यावेळी दिली.

नमस्कार फाउंडेशन या संस्थेविषयी अधिक माहिती देताना सलीम शिकलगार यांनी सांगितले की, नमस्कार फाउंडेशन या संस्थेची स्थापना २००३ साली संस्थापक अध्यक्ष सुहास जोशी यांनी केली. समाजाचे शारीरिक व सांस्कृतिक आरोग्य सुदृढ राहावे. यासाठी ही संस्था पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोवा राज्यात सक्रिय आहे. कोविड काळात ५ वर्षांपूर्वी रस्त्यावर राहणारे फिरस्ते आणि गोरगरीब रुग्ण यांच्यासाठी मोफत “रोटी बँक” चा उपक्रम सुरू केला होता. तेंव्हापासून रोज नियमितपणे दानशूर व्यक्तींच्या सहयोगाने आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे रोज दुपारी १२:३० वाजता, मोफत जेवण देण्यात येते. तसेच आकुर्डी गावातील कै. मल्हारराव कुटे रुग्णालय येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी दुपारी ४ वाजता, मोफत हर्बल टी आणि सायं. ७ वाजता, रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत जेवण देण्यात येते.

यापूर्वी संस्थेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक उपक्रमात पुष्कर श्रोत्री, संजय मोने, मुक्ता बर्वे, संजय नार्वेकर, भूषण कडू, अभिजीत कोसंबी, कार्तिकी गायकवाड, रवींद्र साठे, ज्ञानेश्वर मेश्राम, शरद उपाध्ये, मा. गो. वैद्य, विश्वास मेहंदळे यांनी उपस्थिती लावली आहे.यावर्षी आयोजित केलेले सर्व सांस्कृतिक उपक्रम नागरिकांसाठी मोफत असल्याची माहिती अतुल भोंडवे यांनी दिली.शिबिरात सहभागी होण्यासाठी 9604992033/9579402954 या क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन नमस्कार फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे .