मुळा नदी सुधार प्रकल्प ज्या पद्धतीने राबविला जातो ते चुकीचे असून काम त्वरित थांबवा अशी मागणी नदीप्रेमिनी लावून धरली आहे. प्रशासन दाखल घेत नसल्याने पर्यावरण प्रेमींनी मानवी साखळी
आंदोलन सुरू केले आहे. आज याच विषयावर प्राजक्ता महाजन, संतोष माचुत्रे, शुभम पांडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन एक निवेदन दिले.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्काळ आयुक्त शेखर सिंह यांना फोन लावून विचारणा केली. पर्यावरणप्रेमी दाखल घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
शेकडोने वृक्षतोड, भराव टाकून भिंत बांधण्याचा हा कुठला सुधार प्रकल्प अशी विचारणा केली.