नग्न फोटो पाठविणाऱ्या मंत्र्याबाबात आणखी एका महिलेचे गाऱ्हाणे

0
2

* ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेच्या अडचणी वाढणार
दि. ६ महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवून बदनाम करणाऱ्या आताच्या मंत्रीमंडळातील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची आता आणखी एक भानगड चव्हाट्यावर आली आहे. २०१६ मध्ये गोरे यांनी ज्या महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले होते आणि जामीन फेटाळल्यावर दहा दिवस जेलची हवा खाल्ली होत माफी मागितली होती. आता त्याच महिलेने हे प्रकरण मी बाहेर काढणार असल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे.
आपण या सर्व प्रकरणात २०१६ मध्येच निर्दोष सुटलो आहोत, विरोधक मला बदनाम करण्याचे राजकारण करत असल्याचा खुलासा गोरे यांनी माध्यमांकडे केला होता. त्यात वास्तव किती हे तपासण्यासाठी लयभारी या पत्रकार तुषार आबासाहेब खरात यांच्या चॅनलला त्यांननी विस्तृत मुलाखत दिली. खरात यांनी गोरे यांच्याबाबतचे ते सर्व प्रश्न विचारले आणि महिलेने त्यावर सविस्तर उत्तर देत मंत्री गोरे यांचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला. गोरे यांनी केलेल्या खुलाशाला काही अर्थ नाही, त्यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असेही महिलेने स्पष्ट केले.
यावेळी मुलाखतीच्या शेवटच्या टप्यात बोलताना मंत्री गोरे यांनी आणखी एका महिलेला जयकुमार गोरे यांनी पिडले आणि त्रास दिल्याचा गौप्यस्फोट या मोहिते ताईंनी यावेळी बोलताना केला. वेळ प्रसंगी मी सर्व पुराव्यासह ते जाहीर करणार आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे मी न्याय मागणार आहे.
गोरे यांची चूक नव्हती तर मग त्यांनी स्वतःचा मोबाईल का फोडला, न्यायालयात माझ्या पाया का पडला, असा सवाल केला. गोरे यांनी लोटांगन घालून मला नमस्कार केला आणि पुन्हा त्रास देणार नाही, अशी हमी दिल्याने मी केस मागे घेतली आणि तो निर्दोष सुटला, असेही श्रीमती मोहिते यांनी स्पष्ट केले. खरे तर, त्याचवेळी मी सावध झाले असते आणि माध्यमांकडे संपर्क केला असता तर आज तो मंत्रीसुध्दा झाला नसता, असेही त्यांनी सांगितले.