नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव उत्साहात साजरा

0
263

पिंपरी,दि.24(पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील मानाची पारंपरिक दहिहंडी म्हणून ओळखली जाणारी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित ‘अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी गोविंदा पथकास’ मिळाला.

या दहीहंडी महोत्सवाची सुरवात चिंचवडगावातीलच ‘श्री वरदहस्त’ पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली.

मुंबई चेंबूर मधील शितळादेवी गोविंदा पथक व पिंपरी चिंचवड मधील ताथवडे गावातील ‘नृसिंह गोविंदा पथकाने’ चित्तथरारक कसरंतीचे प्रदर्शन व स्पर्धा करीत सलामी देत प्रेक्षकांची मने जिंकली.

शेवटी चेंबूरच्या ‘शितलादेवी’ गोविंदा पथकाने दहिहंडी फोडण्याचा मान मिळवला.

दहिहंडी महोत्सवाचे संयोजक अॅड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने 5,55,555 रुपयांचे बक्षीस व ट्राॅफी या गोविंदा पथकास देण्यात आली.

‘तू तेव्हा अशी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील ‘पुष्पावल्ली’ म्हणजेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘अभिज्ञा भावे’ हे या दहिहंडीचे मोठे आकर्षण होते.

दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या महीला आमदार उमाताई खापरे या विधानपरिषदेवर निवडूण आल्याबद्दल तसेच भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, मनपा सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा यावेळी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आले.

यावेळी टाटा मोटोर्स युनियन चे माजी अध्यक्ष व जेष्ठ भाजपा नेते पै. ज्ञानेश्वर शेडगे, समितीचे मार्गदर्शक दत्ताभाऊ चिंचवडे, चापेकर स्मारक समितीचे सदस्य गतिराम भोईर, भाजपा प्रदेश सदस्य संतोष कलाटे, पै.विजय गावडे, मनपा ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, मनपा कर्मचारी महासंघाचे मा.अध्यक्ष अंबर चिंचवडे, भाजपा शहर उपाध्यक्ष पाटीलबुवा चिंचवडे, शेखर चिंचवडे, विनोद मालू, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, भाजपा जेष्ठ नेते रविंद्र देशपांडे, कामगार नेते हरीभाऊ चिंचवडे, भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, भाजपा मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, मंडल सरचिटणीस रविंद्र प्रभुणे, तेली समाजाचे युवा शहराध्यक्ष विठ्ठल सायकर, टाटा मोटोर्स युनियनचे उपाध्यक्ष नयन पालांडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता चिंचवडे, राघूशेठ चिंचवडे, सुनिल लांडगे, महेश लांडगे, सुरज भोईर, स्वप्निल देव, राजन पाटील, अख्तर पिंजारी, वरद देव, मयुर देव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.