नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
1243

सांगवी, दि. ०६ (पीसीबी) – नवी सांगवी प्रभागाचे नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नवनाथ जगताप यांचा वाढदिवस बुधवार (दि. ०८) रोजी साई चौक सांगवी येथे साजरा होणार आहे.

जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विषयक रक्तदान शिबीर, हृदयरोग तपासणी, त्वचा रोग निदान शिबीर, नेत्ररोग तपासणी शिबीर, शारीरीक तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोफत पीयुसी काढुन देण्यात येणार आहे.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे नागरीक एकत्र जमले नाही, आता संपुर्ण जग पुर्वीप्रणाणे होत आहे. नवनाथ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख आरोग्यविषयक कार्यक्रम साजरा करणार आहोत. तसेच नागरिकांना मास्क व सेनिटायझरचा वापर करुन एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले आहे.