नक्षञाचं देणं काव्यमंचचा २४ वा वर्धापनदिन २४ पुस्तके ,कवींचे कॅलेंडर व काव्यमैफलने संपन्न

0
199

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,भोसरी,पुणे ३९ चा २४ वा वर्धापन दिन नुकताच सायन्सपार्क नाट्यगृह,विज्ञान केंद्र,चिंचवड येथे उत्साहात ,आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक थोर समाजसेवक ,साहित्यिक पदमश्री डाॅ.गिरीश प्रभुणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ.तुकाराम रोंगटे,ज्येष्ठ शास्ञज्ञ डाॅ.अशोक नगरकर,ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डाॅ.सुरेंद्र बेंडे,गोवा महामार्ग अभियंता वसंत टाकळे,नक्षञाचं देणं काव्यमंच संस्थापक राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे,समाजसेवक सुभाष वाल्हेकर,सुधीर मरळ,चिञकार सुभाष जगताप,प्रा.डाॅ सौ सुनिता रोंगटे ,प्रदीपदादा वाल्हेकर,इ.अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

वृक्षपूजन,झाडाला पाणी घालून अगदी आगळ्या वेगळ्या पध्दतीने उदघाटन करुन पर्यावरण संदेश देत हा सोहळा रंगला.कार्यक्रमाचे उदघाटक पदमश्री डाॅ.गिरीश प्रभुणे म्हणाले की,”कवींना उपेक्षित ठेवण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासुनची आहे.पण या नक्षञाचं देणं काव्यमंचाने कवींना आदर आणि सन्मान देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे.अनेक पुस्तक रुपाने व काव्यवाचनातून संपूर्ण महाराष्टातून आलेल्या कवींना भेटता आले.आम्ही काही वर्षांपूर्वी दलित साहित्य संमेलन घेतले होते.त्या वैशिष्ट्येपूर्ण संमेलनाची आज आठवण झाली.उपेक्षित असलेल्याला कवी वर्गाला हे व्यासपीठ एक आशेचा किरण आहे.पर्यावरणाची नाळ जोडणा-या या संस्थेची भूमिका वृक्षाला पाणी घालून उदघाटन करण्या-या उपक्रमातून दिसुन येते.माणसांनी संवेदना जपल्या पाहीजेत.भविष्यातील अनेक कवी या व्यासपीठावरुन घडावे.गेली २४ वर्षांच्या वाटचालीत भव्य उपक्रम राबविणारी ही क्रियाशील संस्था आहे.विविध उपक्रमातून दाखवून दिले आहे.कवींच्या पाठीमागे समाजाने उभे रहावे.भविष्यातील एक संवेदनशिल माणूस कवी हा वर्गच राहणार आहे.संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करतो.समाजाचा आरसा दाखविण्याचे काम कवींनी करावे.विविध वास्तव टिपणारे लेखन करावे.”

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ.तुकाराम रोंगटे म्हणाले,”
नक्षञाचं देणं काव्यमंचची २४ वर्षांची यशाची वाटचाल ही कौतुकास पाञ आहे.अनेक कवींना घडविणारे हे व्यासपीठ ठरले आहे.नवनवीन कवींच्या प्रतिभेला फुलविणारी एकमेव महाराष्टातील ही संस्था आहे.मायमराठीचा जागर गेली २४ वर्षे सुरु ठेवणे हीच मराठी भाषा समृध्द असल्याची ग्वाही आहे.मराठी भाषेच्या विकासासाठी आणि वाढीसाठी संस्थेने विविध पुस्तकांचे प्रकाशन करुन कवींना जनसामान्यापर्यंत पोहचविले आहे.”कवींचे कॅलेडर -२०२४” व२४ पुस्तकाचे एकाच वेळी प्रकाशन करणे हे या कार्यक्रमाचे हे वैशिष्टे आहे.भविष्यातील नामवांत कवी घडतील अशी आशा आहे.”

२४ व्या वर्धापनदिनी प्रकाशित झालेली २४ पुस्तके पुढील प्रमाणे आहे.त्यात
१)कविवर्य श्री रामदास अवचर-नगर
(मृगजळ-काव्यसंग्रह)
२)कविवर्य श्री यशवंत घोडे-जुन्नर
(निसर्गपूजक-काव्यसंग्रह)
३)कवी वादळकार,पुणे
(ह्रदयाचे न बोलणारे ठोके-काव्यसंग्रह)
४)कविवर्या सौ.वृषाली टाकळे-रत्नागिरी(रंग कवितेचे-काव्यसंग्रह)
५)कविवर्या प्रा.सुरेखा कटारिया-चिंचवड
(लेखनरंग बोलू गुलू गुलू-काव्य,लेखसंग्रह)
६)कविवर्या सौ.मेहमुदा शेख-देहूगांव
(लांजवती-काव्यसंग्रह)
७)कविवर्य संतोष दळवी-भोर
(सांगायचे तुला जे-काव्यसंग्रह)
८)कविवर्य प्रा.नरेंद्र पोतदार-गोंदिया
(प्रीतरंग-काव्यसंग्र)
९)कविवर्य केशव वारे-रायगड
(रानवारा-काव्यसंग्रह)
१०)कविवर्या श्रीमती प्रतिभा गारटकर-इंदापूर(अमेरिकेचे पहिले राष्टाध्यक्ष व माझी आजी एक साहित्य लेखिका-चरिञ)
११)कविवर्या कु.ञरूतुराजे कुकडे-धाराशीव
(बालमन-काव्यसंग्रह)
१२)लेखक डाॅ.प्रकाश कोंडेकर-मुंबई(निसर्गोचार काळाची गरज)
१३)लेखक प्रा.प्रविण सोनवणे-जुन्नर
(शिवचरिञातून काय शिकावे?-वैचारिक)
१४)कविवर्य दिनेश चव्हाण-चाळीसगाव
(बोल हेअंतरीचे-वैचारीक लेखसंग्रह)
१५)कवी वादळकार,पुणे-
(आसक्या-अस्सल ग्रामिण कथासंग्रह)
१६)कविवर्य संतोष दळवी-भोर(व्यर्थ वेचली फुले-काव्यसंग्रह)
७)कवी वादळकार,पुणे
(सुविचार संग्रह-२०२५)
१८)कविवर्या सौ कीर्ती लंगडे-नागपूर
(अंतरीची ठेव-काव्यसंग्रह)
१९)कविवर्य श्री यशवंत घोडे-जुन्नर
(निसर्गाचे उपासक-काव्यसंग्रह)
२०)कविवर्या सौ.सुलम चव्हाण-मालाड,मुंबई-मनोमनी
२१)कविवर्या सौ.प्रीती रा.सोनवणे-भोसरी,पुणे
(अव्यक्त वेदना-काव्यसंग्रह)
२१)संपादक कवी वादळकार(नक्षञांचा काव्यझरा-प्रतिनिधी काव्यसंग्रह)
२२)कविवर्या सौ संगितारामटेके-गडचिरोली
(ह्रयातील भाव-काव्यसंग्रह)
२३)बाप-प्रतिनिधी काव्यसंग्रह(संपादक-कवी वादळकार,पुणे)
२४)कविवर्य रामदास अवचर-अ.नगर(काव्यसंग्रह) इ.पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन करण्यात आले.त्यामुळे या उपक्रमाची महाराष्ट बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये नोंद करण्यात येत आहे.यावेळी प्रत्येक कवींची नक्षञ बहारदार काव्यमैफल संपन्न झाली.सर्व कवीकवयिञींना सन्मानचिन्ह,सन्मानपञ,शाल,पुस्तक,गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी गडचिरोली,चंद्रपूर,सोलापूर,
सांगली,अहमदनगर,मुंबई,रायगडधाराशिव,कोल्हापूर,सातारा
,रत्नागिरी,’नाशिक,ठाणे,रायगड,बीड,नाशिक,भोसरी,निगडी,
चिंचवड,काञज,खेड,आळेफाटा,पेण,जुन्नर,फोफसंडी,भोर,
चिखली,
पुणे इ.भागातून कवी कवयिञी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या संयोजनात सौ.दिव्या भोसले,यशवंत घोडे,साईराजे सोनवणे,पियुष काळे,भाऊसाहेब आढाव,सुहास जगताप,डाॅ.गिरीश सकपाळ,ज्ञानेश्वर काजळे,सुनिल बिराजदार,प्रदीपदादा वाल्हेकर,सुधीर मरळ,सचिन खोले,वसंतराव ढवळे,अमित आवटे,सचिन कुलकर्णी,यशवंत गायकवाड इ.पुढाकार घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.सूञसंचालन कवयिञी सौ.रुपाली भालेराव,कवयिञी सौ.प्रीती सोनवणे यांनी केले,आभार प्रदर्शन कवी सुनिल बिराजदार यांनी मानले.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली