नऊवारी साडी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन चिंचवडमध्ये

0
391

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते या शहरांमध्ये प्रथमच नऊवारी साड्या घालून भव्य फॅशन शो चे आयोजन चिंचवडमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रीय संस्कृतीला साजेसा असा नऊवारी साज व त्यासोबत पुरूष आयकॉन (ट्रॅडिशनल कपडे) या स्पर्धेत लहान मुलं मुली देखील सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील नऊवारी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले नऊवारी नार वस्त्र दालन यांच्यातर्फे सौ चैताली नकुल भोईर यांनी केले आहे. या सर्व स्पर्धा चार गटांमध्ये होत असून मिस मिसेस मिस्टर किड्स या गटात स्पर्धेमध्ये 100 हून स्पर्धेक पिंपरी-चिंचवड शहरातून सहभागी झालेले आहे.या स्पर्धेमध्ये विजेत्या होणारया स्पर्धकांना सोन्याची नथ व सोन्याचे ब्रेसलेट पैठणी साड्या, क्राऊन, ट्रॉफी विविध आकर्षक बक्षिसे तसेच प्रेक्षक म्हणून सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना एक ग्रॅम सोन्याची नथ व विविध गिफ्ट हॅम्पर बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय लावणी सम्राट किरण कोरे यांच्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रमाची मेजवानी आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विविध राजकीय मान्यवर व सिने कलाकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा शनिवार दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सुरू होणार असून तो चार वाजेपर्यंत सुरू राहील.
कार्यक्रम हा शनिवारी 9 जुलै रोजी चिंचवड मधील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी या भव्यदिव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक चैताली भोईर यांनी केले आहे.