पुणे दि ११ (पीसीबी) – राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सामील झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. पण अजूनही पालकमंत्र्यांची यादी रखडलेली आहे. अशातच स्वातंत्र्य दिनासाठी झेंडावंदन करण्यासाठी मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीत आता बदल कऱण्यात आला आहे. पुण्यात राज्यपालांच्या हस्तेच झेंडावंदन होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर रायगडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या यादीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असा उल्लेख होता. मात्र, पुण्यात इंग्रज काळापासून विधानभवन असल्या कारणामुळे प्रथेप्रमाणे दरवर्षी 15 ऑगस्टला राज्यपालच ध्वजारोहण करतात. पालकमंत्री यावेळी हजर असतात. त्यामुळे नव्याने यादी दुरस्ती करण्यात आली आहे. आता चंद्रकांत पाटील यांच्यावर रायगडमध्ये ध्वजारोहण सोहळ्याला हजर राहणार आहे.
15 ऑगस्टला देशाचा 76 वा वर्धापन दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. राज्यातही स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करत असतात. पण अद्याप पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. गुरुवारी राज्य सरकारकडून एक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.