धोकादायकपणे गॅस चोरी प्रकरणी खंडणी विरोधी पथकाची कारवाई

0
42

दिघी, दि. 14 (प्रतिनिधी)

धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी प्रकरणी खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने कारवाई केली. यामध्ये 77 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 13) दुपारी चऱ्होली फाटा येथे करण्यात आली.

पांडुरंग दयानंद खताळ (वय 21 रा. चऱ्होली फाटा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय नलगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली फाटा येथे एका खोलीमध्ये मोठ्या सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या लहान सिलेंडर मध्ये चोरून तसेच धोकादायक पणे गॅस काढला जात असल्याची माहिती खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत 77,400 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.