धामणे गावात नऊ लाखांची घरफोडी

0
111

दि २९ मे (पीसीबी ) – मावळ तालुक्यातील धामणे गावात अज्ञातांनी घरफोडी करून आठ लाख 78 हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी उघडकीस आली.

पांडुरंग वाघोजी गराडे (वय 53, रा. धामणे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गराडे यांनी त्यांचे घर शनिवारी (दि. 25) सकाळी सहा वाजता कुलूप लाऊन बंद केले होते. दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण आठ लाख 78 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.