पुण्यात तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारा अभावी मृत्यू झाला. हा प्रकार सर्वप्रथम ‘पुणे मिरर’ने सविस्तर वृत्त देत समोर आणला. त्यानंतर, पुण्यामध्ये रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अशातच, याप्रकरणी राज्य शासनाच्या समितीचा अहवाल समोर आला असून तनिषा भिसे यांच्या मृत्यूला रुग्णालय दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर शासनाचा अहवाल सादर होताच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. घैसास यांच्या राजीनाम्यानंतर डॉ. धनंजय केळकर व इतर डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पण माध्यमांनी धर्मादाय रुग्णालय असताना नियम का पाळले नाहीत ? असा सवाल उपस्थित करताच डॉ. धनंजय केळकर व इतर डॉक्टरांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे न देताच पळ काढला.
रुग्ण पात्र असूनही, तिला धर्मादाय योजनेअंतर्गत भरती करून उपचार करण्यात आले नाहीत. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट, 1950 अंतर्गत स्कीम नंबर 3 नुसार आपत्कालीन रुग्णांना तत्काळ उपचार व जीवनरक्षण सेवा मोफत/सवलतीने द्यावी लागते, परंतु तसे न केल्याचे दिसून आल्याचे राज्य शासनाच्या समितीचा अहवाल म्हटलं आहे.
राज्य शासनाचा हाच मुद्दा उचलून धरत माध्यमांनी डॉ. धनंजय केळकर व सोबत असलेल्या इतर डॉक्टरांना कोंडीत पकडण्याच प्रयत्न केला. पण उत्तर न देता डॉ. केळकर भर पत्रकार परिषदेतून उठून गेले. यावेळी माध्यमांनी, त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा मारा केला.
धनंजय केळकर घैसास यांच्या राजीनाम्याचे कारण केलं स्पष्ट
सामाजिक प्रक्षोभनामुळं गेल्या काही दिवसांपासून दडपणाखाली वावरत आहे. धमक्याचे फोन. समाज माध्यमांकडून होणारी टीका. सामाजित संघर्ष आणि तणावाचे वातावरण हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे आहे. असं त्यांनी राजीनाम्यामध्ये नमुद केलं आहे. तसेच, त्याचा परिणाम सध्याच्या त्यांच्या रुग्णांवर होईल अशी भीती वाटत आहे. त्यामुळं मी या पदाचा राजीनाम देत असल्याचे डॉ. घैसास यांनी म्हटलं असल्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.