परत निवडणुका घ्या, आमदार सोडून गेल्याने सेना संपत नाही
मुंबई, दि. ८ (पीसीबी) : शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, हे मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. शिवसेना विधीमंडळातील आणि रस्त्यावरची वेगवेगळी आहे. अगदी सगळे आमदार सोडून गेले तरी शिवसेनेचा धनुष्यबाण कायम राहणार आहे, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, परत विधानसभेच्या निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “कालपासून मी अनेक शिवसैनिकांशी संवाद साधतो आहे. सगळ्यांच्या भावना दाटून आल्या आहेत. लोकांवरील दडपण हलकं करणं माझं काम आहे. शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं मी बोलणार नाही. पण कालच्या भेटीगाठीतील चर्चेतून शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेत नाही. चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणचं नव्हे तर उमेदवारही पाहतात. काल मी शिवसैनिकांना गेल्या काळात काय काय झालं होतं ते काल सांगत होतो. त्यामुळं त्याचा अर्थ असा होत नाही की आमचं चिन्ह जाणार आहे”
मग तेव्हा त्यांची दातखीळ बसली होती का ?
मातोश्रीवर विकृत भाषेत टीका करणाऱ्यांविरोधात गप्प का होता ? असा करत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी मनातील खंत बोलून दाखवली. बंडखोरीबाबत मलाही वाईट वाटत आहे. मला कुठेही वाद विवाह होऊ द्यायचा नाही. आमच्यावर विकृत टीका करणाऱ्यांवर बोलताना दातखिळी बसली होती का? त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, मत प्रेम खरं की खोटं? असे अनेक सवाल बंडखोरांना ठाकरेंनी केले.