धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठी बातमी सोन्याच्या दारात घसरण !

0
2

दि.१८(पीसीबी)-सणासुदीच्या तोंडावर वाढत्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. सोने प्रतितोळा (GST) सह १,३५,००० रुपयांवर पोहोचल्याने खरेदी थंडावली होती. मात्र, आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दरांमध्ये घसरण झाल्याने बाजारात पुन्हा एकदा खरेदीसाठी उत्साह संचारला आहे.धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. आज सोन्याच्या भावात तीन हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली, ज्यामुळे (GST) सह सोन्याचा भाव १,३२,००० रुपये प्रतितोळा झाला आहे. गेल्या आठवड्यात भारतातील सोन्याचे दर एका तोळ्यासाठी १ लाख २० हजारांच्या आसपास होते.

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एका माहितीनुसार, चांदीचे दर १,७८,००० रुपयांवरून १,७०,००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर, दुसऱ्या एका अहवालानुसार, गेल्या आठवड्यात प्रति किलो १,९०,००० रुपयांपर्यंत पोहोचलेले चांदीचे भाव, आज एक लाख ७२ हजार रुपयांपर्यंत घसरल्याचे दिसून येत आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात २०२५ या वर्षात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, भावाने ४००० अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. या वर्षात दरांनी ३५ वेळा हा टप्पा गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात सोन्याचे दर प्रति औंस ४५०० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. तर भारतात, येत्या काळात सोन्याचे दर पुन्हा १.३५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असाही अंदाज आहे.

चांदीच्या दरांनीही या वर्षभरात ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे. औद्योगिक क्षेत्रातून असलेली मजबूत मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळे, चांदीचे दर प्रति औंस ७५ डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, भविष्यात चांदीचे दर २ लाख ३० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.