धनंजय मुंडे म्हणजे ‘पुरुष वेश्या’, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदाराचा आरोप

0
14

पुणे, दि .8 (पीसीबी)
“धनंजय मुंडे म्हणजे ‘पुरुष वेश्या’ असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असतं, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता म्हणत गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानेच राज्यात गुंडगिरी सुरू आहे” असाही आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे.

दरम्यान, उत्तम जानकर यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेता रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘लोकप्रतिनिधींनी समाज माध्यमांवर व्यक्त होताना आपली भाषा कायदेशीर ठेवणे गरजेचे आहे. वेश्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. राजकीय व्यक्ती म्हणून तुम्ही आपसातल्या कुरगुडी म्हणून असे विधान वापरणार असाल तर या विधानाचा मी जाहीर निषेध करते’, असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय. तर असे विधान करणारे लोकप्रतिनिधी लायकीचे नाहीत त्यांना त्यांच्या घरातून संस्कार झालेले नाहीत किंवा ते शिकलेले नाहीत. सतत त्यांना प्रकाश झोतात येण्यासाठी हे शब्द वापरतात. जानकरांना मला सांगायचं आहे वेश्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तुमच्या मनगटात दम असेल तर कामाने मोठे होऊन दाखवा, असं आव्हान रुपाली ठोंबरे पाटील यांनी उत्तम जानकर यांना दिलं.