धडक दिल्याचा जाब विचारल्याने दोघांना मारहाण

0
46

दिघी, दि. 11 (पीसीबी) : दुचाकीला धडक दिल्याचा जाब विचारल्याने दोघांना बेदम मारहाण करण्यात आली भरधाव कारणे दुचाकीला धडक देऊन दुचाकीचे नुकसान करण्यात आले ही घटना आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दिघी येथे घडली.

अविनाश शामराव जगताप (वय 28, रा. चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन राजकुमार गावडे (रा. जाधववाडी चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप आणि त्यांचा पुतण्या ओम चंद्रकांत जगताप असे बुलेट दुचाकी वरून देहूफाटा येथील शोरूम मध्ये विसरलेली चावी आणण्यासाठी जात होते. वडमुखवाडी चौक दिघी येथे त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने धडक दिली. त्यावरून त्यांचा आरोपी सोबत वाद झाला. त्यानंतर आरोपीने त्याच्या कारने जगताप यांच्या बुलेट दुचाकीला धडक दिली. या अपघातात जगताप आणि त्यांचा पुतण्या जखमी झाले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.