धक्का लागल्यावरून हिंजवडी मधील पबमध्ये हाणामारी

0
373

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – वॉशरूमला जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 27) मध्यरात्री हिंजवडी येथील एफएमएल पबमध्ये घडली.

रमीज आयुब सिकलगार (वय 32, रा. रावेत) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील आवारे व त्याचे पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ आयुब सिकलगार, चुलत भाऊ तौफिक मुल्ला असे पब मध्ये गेले होते. यावेळी फिर्यादीचा भाऊ सिकलगार हा वॉशरुमला जात असताना त्याचा एका अनोळखी इसमाला धक्का लागला. यावेळी आरोपी व त्याच्या साथीदारांनी सिकलगारला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, बेल्टने मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारून सिकलगारला गंभीर जखमी केले. तौफिक मुल्ला यांनाही मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.