धक्कादायक ! 800 हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये आढळला HIV

0
69

पिंपरी, दि.10 (पीसीबी) – HIV अर्थात एड्स व्हायरसचा संसर्ग झाला तर प्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्याच्या शेवटच्या टप्प्याला एड्स म्हणतात. एका राज्यात 800 हून अधिक विद्यार्थ्यांना या संसर्गाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कशामुळे झाला हा संसर्ग. जाणून घ्या काय होतं त्यामागचं कारण.

एचआयव्ही हा एक धोकादायक विषाणू आहे ज्यामुळे एड्स होऊ शकतो. हा आजार आधी शरीराला पोकळ बनवतो. नंतर लहान आजार जीवघेणे ठरतात. आता त्रिपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे 800 हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये HIV विषाणू आढळला आहे. आतापर्यंत ५७२ मुले जिवंत आहेत तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पुढील शिक्षणासाठी राज्याबाहेर गेली आहेत. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

श्रीमंत मुले करताय घाणेरडे काम
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 220 शाळा, 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून संक्रमन झालेल्या या विद्यार्थ्यांची ही आकडेवारी समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश मुले ही श्रीमंत कुटुंबातील आहेत. पण अचानक हा विषाणू कसा पसरला हे जाणून घेऊयात.

एचआयव्ही पसरण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे एकाच सुईचा वापर करणे. एचआयव्ही हा एक जीवघेणारा आजार आहे. जी संक्रमित सुयांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर पसरते. ही स्थिती नेहमी इंट्राव्हेनस ड्रग्सच्या गैरवापरामुळे उद्भवतेय. एकच सुई अनेक लोकांच्या संपर्कात येते आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, एचआयव्ही विषाणू शरीरातील द्रवपदार्थांमध्ये असतो. जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आला तर त्याचा प्रसार होतो. हा आजार रक्त, आईचे दूध, वीर्य आणि योनिमार्गातून पसरतो.

एड्स हा एचआयव्हीचा शेवटचा टप्पा
एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर शेवटच्या टप्प्याला एड्स म्हणतात. यामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. नंतर त्याला इतर आजार होतात. ज्यामुळे नंतर त्याचा मृत्यू होतो.

एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे
या विषाणूचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे फ्लू. यामध्ये ताप, थंडी वाजून येणे, पुरळ उठणे, झोपेच्या वेळी घाम येणे, स्नायू दुखणे, घशात सूज येणे, थकवा येणे, लिम्फ नोड्समध्ये सूज येणे, तोंडात व्रण येणे अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणे संसर्गाच्या 2 ते 4 आठवड्यांच्या आत जाणवू शकतात.

एचआयव्ही उपचार
डब्ल्यूएचओच्या मते, एचआयव्हीवर अजूनही कोणताही इलाज नाही. अँटीरेट्रोव्हायरल औषधे विषाणूचा प्रसार रोखतात. सुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्ही चाचणी, नवीन सुयांचा वापर यासारख्या उपायांनी तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.