धक्कादायक ! 51 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध

0
290

देहूगाव, दि. २५ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीसोबत 51 वर्षीय व्यक्तीने जवळीक साधून तिच्याशी प्रेमसंबंध बनवून तिचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहत देहूरोड येथे उघडकीस आला आहे.

सईद मोहम्मदमुसा चाऊस (वय 51, रा. देहूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. 24) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 एप्रिल 2021 ते 24 जून 2022 या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या भावाच्या १७ वर्षीय मुलीसोबत जवळीक साधली. त्यातून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिचा वापर केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.