धक्कादायक…! शालिमार एक्सप्रेसला आग…!

0
197

मुंबई,दि.०५(पीसीबी) – नाशिक रोड रेल्वे स्थानकावर एका रेल्वेगाडीच्या बोगीला आग लागली आहे. हावडा मेलच्या बोगीला आग लागल्याची ही प्राथमिक माहिती मिळाली असून, आग विझवण्यासाठी रेल्वे स्थानकावर मोठ्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार-हावडा एक्सप्रेसला ही आग लागली आहे. प्रवासी गाडीला आग लागल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, शालिमार-हावडा एक्सप्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात पोहोचताच ही आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांची धावपळ उडाली. या एक्सप्रेसच्या लगेज बोगीला ही आग लागली. या एक्सप्रेसमध्ये एकूण चार डबे लगेजचे असल्याने या घटनेत मनुष्यहानी झालेली नाही.

मात्र, या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एक आणि दोन चालू राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. रेल्वे स्थानकावरील हेड वायर तुटल्याने तूर्तास प्लॅटफॉर्म नंबर तीन वरील रेल्वे सेवा दुसऱ्या बाजूने वळविण्यात आल्याची माहिती देखील प्रशासनाकडून मिळाली आहे.