धक्कादायक व्हिडिओ…! मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार…

0
2459

मुंबई,दि.१६(पीसीबी) – पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी समुद्रात जाऊ असं आव्हान वारंवार केलं जातं. अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हे नसतं धाडस जीवावरही बेतू शकतं. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्राला उधाण आलं असताना एक जोडप समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट करत होतं. तर त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवत होता. पण तो क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नसतं धाडस जीवाशी –
ही घटना प्रत्येकासाठी इशारा आहे. समुद्राला उधाण आलं असताना समुद्रापासून दूर राहिला पाहिजे. थोडीसी मस्करी जीवावार बेतू शकते. नेमकं याकडेच या जोडप्याने दुर्लक्ष केलं आणि एका चुकीमुळे महिलेने जीव गमावला. समुद्राच्या लाटेबरोबर ही महिला समुद्रात वाहून गेली. पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत त्या महिलेचा जीव गेला. ही घटना मुंबईतल्या बँड स्टॅंड इथली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ आपल्या प्रत्येकासाठी सावध करणारा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलैला एक कुटुंब समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलं होतं. मुकेश सोनार, पत्नी ज्योती सोनार आणि त्यांची तीन मुलं रविवार असल्याने बँड स्टॅंड जवळ मौजमजेसाठी आले होते. यावेळी समुद्राच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्याचा मोह मुकेश आणि ज्योती सोनारला झाला. मुकेश आणि ज्योती समुद्रातील खडकांवर बसून फोटोशूट करत होते. तर त्यांचा मोठा मुलगा मोबाईलमध्ये आपल्या आई-बाबांचे फोटो आणि व्हिडिओ बनवत होता. काहीवेळ असाच मजेत गेला. पण अचानक समुद्राची एक मोठी लाट आली आणि त्या लाटेत पती आणि पत्नीचा हात सुटला. पत्नी लाटेबरोबर समुद्रात वाहून गेली. पती आणि मुलं तीला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागली. पण उसळत्या समुद्रात तिला वाचवणं त्यांना शक्य झालं नाही आणि त्यांच्या डोळ्यादेखत महिला समुद्रात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.