धक्कादायक…! भाजप कार्यकर्त्याने केली आदिवासी तरुणावर लघुशंका…

0
386

मध्य प्रदेश,दि.०५(पीसीबी) – मध्य प्रदेशातील एक थेट लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका मद्यधुंद व्यक्तीने पायऱ्यांवर बसलेल्या आदिवासी तरुणावर लघवी केली. आरोपी प्रवेश शुक्ला हा भाजप आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस भाजपवर हल्लाबोल करत आहे. दरम्यान आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आहे. ज्या आदिवासी माणसावर लघवी करण्यात आली. त्याचे नाव पाले कोल असून तो सिधी जिल्ह्यातील करोंडी गावचा आहे. मात्र, हे प्रकरण पेटल्यानंतर भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांनी आरोपी त्यांचा प्रतिनिधी नसल्याचे सांगितले.

केदारनाथ शुक्ला यांचा मुलगा गुरुदत्त शरण शुक्ला यांनी सांगितले की, हा आरोपी भाजपचा कार्यकर्ता नाही आणि त्याचा आधीच राजीनामा घेण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सिधी जिल्ह्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत दोषीला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दोषीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला
सिधी जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणावर लघवी करण्याच्या क्रुरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासी समाजातील तरुणांसोबत अशा घृणास्पद आणि अधोगतीला सुसंस्कृत समाजात स्थान नाही. लघवी करणारी व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे, असे काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे.