धक्कादायक ! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची, तर संगमनेरमध्ये आई-वडिलांची आत्महत्या

0
127

अहमदनगर, दि. ०५ (पीसीबी) : अहमदनगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाच्या निधनानंतर दहा दिवसांतच आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकानजीक असलेल्या वाडेकर गल्लीत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 8 दिवसांपूर्वीच पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलाने देखील आत्महत्या केली होती. तसेच 2 वर्षापूर्वी त्यांच्या 16 वर्षीय मुलानेही आत्महत्या केली होती. त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांनी अशाप्रकारे जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
काही दिवसापूर्वी पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मुलाने आत्महत्या केली. त्यानंतर मुलाच्या दहाव होण्यापूर्वीच वडिल गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि आई गौरी गणेश वाडेकर यांनी देखील आत्महत्या केली. या घटनेनंतर वाडेकर कुटुबीयांबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कौटुंबिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू

गणेश वाडेकर हे संगमनेर नगरपालिकेतून सध्या सेवानिवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी गौरी वाडेकर या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी मृत दाम्पत्याच्या अवघ्या 16 वर्षीय मुलाने देखील घरातच गळफास घेत आत्महत्या केली होती. तर 8 दिवसांपूर्वी 21 वर्षीय मोठ्या मुलाने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी देखील आत्महत्या केली. त्यामुळे अख्ख्या कुटुंबानेच आत्महत्या करुन जीवन संपवल्याचा प्रकार संगमनेर शहरात घडला आहे.