धक्कादायक ! पाठलाग, डोक्यात मिरची पावडर टाकून तरुणीवर वार.

0
185

निगडी, दि. २३ (पीसीबी) – तरुणीचा पाठलाग करून तिच्या गुप्तांगावर दारू ओतली. तसेच डोळ्यात मिरची पावडर टाकून हातावर ब्लेडने वार केले. तसेच तिचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 22) सकाळी गुरुदेवनगर, गंगानगर, निगडी येथे घडला.

चेतन मारुती घाडगे (वय 31, रा. औंधगाव, पूण ) आणि तीन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चेतन याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित 27 वर्षीय तरुणीच्या 32 वर्षीय भावाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण गुरुवारी सकाळी बेल्हेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेली. दर्शन घेऊन ती परत येत असताना आरोपी चेतन याच्या सांगण्यावरून तीन आरोपींनी काढ रे काढ कोयता. हिच्यावर वार करू, असे म्हणून तरुणीचा पाठलाग केला. तरुणी जवळच असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेली. आरोपींनी शौचालयात येऊन तरुणीच्या गुप्तांगावर दारू ओतून तिला मिरची पावडर खाऊ घातली. तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तिच्या हातावर ब्लेडने वार केले. तरुणीचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपी चेतन याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.