धक्कादायक… दुधात मायक्रोप्लास्टिक

0
358

इटली, दि. ११ (पीसीबी) – आईच्या दुधातील पोषक तत्वांमुळे बाळाची वाढ होण्यास मदत होते. तसेच, बाळाला निरोगी राहण्यासाठी आईच्या दुधातील पोषक तत्व अत्यंत फायदेशीर ठरतात. पण बाळाला नवसंजीवनी ठरणाऱ्या या दुधात मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. इटलीतील एका संशोधकांच्या पथकानं आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक शोधले आहेत. यासोबतच या दुधाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. हे संशोधन करताना शास्त्रज्ञांनी, एका 34 वर्षीय आईच्या अनेक चाचण्या घेतल्या.

या महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या दुधात प्लास्टिकचे कण आढळल्याचं शास्त्रज्ञांच्या संशोधनादरम्यान निष्पन्न झाले आहे. आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक सापडले असल्यानं संशोधकांच्या एका गटानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, गरोदर असताना महिला प्लास्टिकमध्ये पॅक करण्यात आलेले पदार्थ, पेय आणि सीफूड्सचं यांचं सेवन करतात. त्यासोबतच वैयक्तिक स्वच्छतेसाठी प्लास्टिकयुक्त उत्पादनांचा वापर करतात. याचा मायक्रोप्लास्टिकच्या उपस्थितीशी कोणताही संबंध नाही.