धक्कादायक! दहा वर्षीय मुलीशी गैरवर्तन करत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न

0
123

 खेड, दि. ३० ऑगस्ट (पीसीबी) – मैत्रिणीला घरी सोडून आपल्या घरी परत येत असलेल्या 10 वर्षीय मुलीसोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 28) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडला.

प्रसाद ज्ञानेश्वर कुंभार (वय 35, रा. नढे नगर, काळेवाडी. मूळ रा. वीर, ता. पुरंदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 10 वर्षीय मुलगी तिच्या 10 वर्षीय मैत्रिणीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेली. मैत्रिणीला घरी सोडून परत येत असताना मोकळ्या जागेत थांबलेल्या आरोपीने मुलीचा हात जबरदस्तीने पकडला. तिच्याशी गैरवर्तन करून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी मुलीने जोरात आरडाओरडा केला. तसेच आरोपीला धक्का दिला. त्यामुळे मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटली. त्यानंतर आरोपी मुलीला सोडून पळून गेला. पोलिसांनी आरोपी प्रसाद कुंभार याला अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.