धक्कादायक … तरुणीला ड्रग्ज पासून सात दिवस २३ जणांकडून अत्याचार

0
8

वाराणसी, दि. १२ : उत्तर प्रदेशच्या वाराणसीत सामूहिक बलात्काराची भयंकर घटना घडली आहे. १९ वर्षीय तरुणीचं अपहरण २३ जणांनी तिच्यावर ७ दिवस अत्याचार केले. चालत्या कारमध्ये, कॅफे, हॉटेलमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत तरुणीवर अत्याचार करण्यात आले. पीडिता वाराणसीच्या हुकूलगंज परिसराची रहिवासी आहे. ती इंटरमीडिएटची विद्यार्थिनी आहे.

पीडित तरुणी २९ मार्चपासून बेपत्ता होती. स्पोर्ट्स कोटामधून प्रवेश घेण्यासाठी तिची तयारी सुरु होती. ती महाविद्यालयात धावायला जायची. २९ मार्चला तरुणीचा साथीदार तिला शहरातील पिशान मोचन परिसरातील हुक्काबारमध्ये घेऊन गेला. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, तिला शीतपेयातून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर सिगरा भागातील विविध हॉटेलांमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे.

दुर्घटनेमुळे भेदरलेल्या लेकीचा सगळ्यांनी गैरफायदा घेतल्याचं पीडितेच्या आईनं सांगितलं. ‘हॉटेलच्या बाहेर तिला इमरान भेटला. त्यानं हॉटेलमध्ये नेऊन तिला गुंगीचं औषध दिलं. यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला साजिद नावाचा तरुण भेटला. दोन मित्रांसोबत तो तिला औरंगाबादमध्ये घेऊन गेला. तिथे एका गोदामात तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यानंतर साजिद त्याचा मित्र अमनसोबत तिला एका खोलीत गेऊन गेला. तिथे तिच्यावर रात्रभर दुष्कृर्त्य करण्यात आलं. रात्री तिला सिगरातील मॉलजवळ सोडून देण्यात आलं. तिथे २ एप्रिलच्या सकाळी तिला राज खान नावाचा तरुण भेटला,’ असा घटनाक्रम पीडितेच्या आईनं कथन केला.

‘राजनं हुकूलगंजमधील घरी नेऊन गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीनं त्याला विरोध केला. त्यामुळे त्यानं तिला अस्सीला आणून सोडलं. ३ एप्रिलला लेक तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिथेच झोपली. संध्याकाळी घरी परतत असताना तिला दानिश भेटला. तो तिला एका खोलीत घेऊन गेला. तिथे सोहेल, शोएब आणि अन्य एकानं तिच्यावर अत्याचार केले. त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत पीडिता ४ एप्रिलला घरी आली आणि आपबिती कथन केली,’ असं पीडितेच्या आईनं सांगितलं.

‘३ एप्रिलच्या रात्री साजिदनं माझ्या लेकीला एका कारवाल्यासोबत बसवलं. कारमध्ये आधीच ५-६ तरुण होते. त्यांनी धावत्या कारमध्ये लेकीवर अत्याचार केले. त्यानंतर तिला रस्त्यात टाकून ते पळून गेले. यानंतर लेक घरी आली. तिनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. ४ एप्रिलला आम्ही पोलिसांकडे तक्रार नोंदवली. लेकीसोबत घडलेल्या घटनेनं तिच्या वडिलांची प्रकृती बिघडली. लेक २-३ दिवस घरी न आल्यानं आम्ही तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली. तेव्हा ती कोणासोबत तरी फिरायला गेल्याचं तिच्या १-२ मित्रांनी सांगितलं. ती कामासाठी गेली असावी असा आमचा समज झाला,’ अशी माहिती पीडितेच्या आईनं दिली.