धक्कादायक…! जावयानेच केला सासू आणि पत्नीवर गोळीबार

0
318

शिरुर,दि.०७(पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरूर येथे न्यायालयाच्या परिसरात माय-लेकींवर गोळीबार झाला आहे. भरदिवसा न्याायलयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

कौटुंबिक वादातून जावयाने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला आहे. त्यांचा न्यायालयात पोटगी साठीचा दावा सुरू होता. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी आई आणि मुलगी न्यायालयात आले होते. न्याायलयाच्या परिसरात थांबलेले असताना माजी सैनिक असलेल्या दीपक ढवळे याने स्वतः जवळच्या लायसन्स असलेल्या पिस्तूलमधून पत्नी आणि सूनेवर गोळ्या झाडल्या.

या गोळीबारात आरोपीच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.