धक्कादायक – कौमार्य विकत १८ कोटी कमावले

0
3

दि . १३ ( पीसीबी ) – जग कुठे चालले त्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. एका 22 वर्षीय तरुणीने चक्क तिचं कौमार्य विकण्याचा निर्णय घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉरा असं या तरुणीचं नाव आहे. इंग्लंडमधील मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या लॉरा हिने तिचं कौमार्य विकण्याचा निर्णय घेतला होता.
लॉराने यासाठी एका एस्कॉर्ट्ससोबत संपर्क साधला आणि कौमार्यबाबत आपला निर्णय तिने त्यांना कळवला. लॉराने कौमार्य विकत घेण्यासाठी कुणी खरेदीदार असतील तर संबंधित एस्कॉर्ट्सला कळवण्यास सांगितले. लॉराच्या या निर्णयानंतर खरेदीदारांची एकच रांग लागली. अखेरीस लिलाव करुन तिच्या कौमार्याची विक्री करण्यात आली. एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने 1.7 दशलक्ष पौंड्स म्हणजेच 18 कोटी रुपये एवढी बोली लावून लॉराचं कौमार्य विकत घेतलं, असा दावा लॉराने केला आहे.

लिलावामध्ये लंडनमधील एक नेता आणि दुबईमधील एका व्यावसायिकानेही सहभाग घेतला होता. पण यामध्ये हॉलिवूड अभिनेत्याने बाजी मारली. हा लिलाव एका प्रसिद्ध एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटद्वारे गुप्तपणे करण्यात आला. अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनी या लिलावात रस दाखवला. लॉरा म्हणाली की हॉलिवूड सेलिब्रिटीसोबत करार करण्यापूर्वी तिला दिग्गज व्यवसायिक आणि राजकारण्यांकडून ऑफर आल्या होत्या. करार पूर्ण करण्यासाठी, लॉराने खरेदीदारासमोर तिच्या कौमार्यची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय चाचणी देखील केली. दोन्ही पक्षांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवण्यात आली होती.

लॉरा ही त्या हॉलिवूड अभिनेत्याला एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटायला गेली. तसेच आपल्या मनात याबाबत कुठलीही भीती नव्हती, तर मी उत्साही होते. या निर्णयाबाबत मी समाधानी आहे, तसेच माझ्या मनात कुठलाही पश्चाताप नाही, असे तिने सांगितले. जर मी कौमार्य न विकता कुणासोबतही संबंध प्रस्थापित केले असते तर कदाचित त्या व्यक्तीने माझ्यासोबत विवाह केला नसता. त्यामुळे मी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे, असं लॉरा म्हणाली. सुरुवातीला या निर्णयामुळे माझ्या आई-वडिलांना धक्का बसला होता. मात्र नंतर ते यासाठी तयार झाले, असेही लॉराने सांगितले.

लॉराने कौमार्य विकण्याचा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. काही लोकांचे असे मत आहे की, कौमार्य विकेणे चुकीचे आहे. तर काहीजणांनी हा वैयक्तिक निर्णय असल्याचं मत व्यक्त केलं आहे.