धक्कादायक … कोलकात्यात महिला डॉक्टरवर सामुहिक अत्याचार

0
72

कोलकाता, दि. १४ ऑगस्ट (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या कोलकात्याच्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत डॉ. सुबर्णो गोस्वामी यांनी ‘टाइम्स नाऊ चॅनल’ला सांगितले की, पीडितेच्या शरीरावर ज्या प्रकारच्या जखमा आढळल्या आहेत, त्या एकाच व्यक्तीकडून शक्य नाहीत. याप्रकरणी डॉक्टरांनी सामुहिक अत्याचाराचा संशय व्यक्त केला आहे.

डॉ. गोस्वामी म्हणाले की, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी नमुने घेतले आहेत. त्यामध्ये मृत महिला डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मोठ्या प्रमाणात वीर्य आढळून आले आहे. त्याचे प्रमाण सुमारे १५१ ग्रॅम आहे. इतके वीर्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असेल.

कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सीबीआयने या प्रकरणाची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. सीबीआयचे विशेष पथक बुधवारी कोलकाता येथे पोहोचून तपासाला सुरुवात करणार आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने विशेष पथक तयार केले आहे.

कोलकात्याच्या आरजी कर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (९ ऑगस्ट) पहाटे ही घटना उघडकीस आली. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली. सुरुवातीला पोलिसांनी याला आत्महत्येचे प्रकरण म्हटले होते. पण, नंतर तपासात डॉक्टरच्या शरीरावर आणि प्रायव्हेट पार्ट्सवर जखमा आढळल्याने हा खून आणि बलात्काराचा गुन्हा मानला गेला.

कोलकाता येथे महिला डॉक्टरची हत्या, देशभरात संप; दिल्लीतील निवासी डॉक्टरांची रुग्णालय सेवा बंद

याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजय रॉयला अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुबर्णो गोस्वामी यांच्या वक्तव्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गोस्वामी यांच्या मते, सापडलेल्या वीर्याचे प्रमाण एका व्यक्तीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत या हत्या आणि बलात्काराच्या घटनेत एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे. डॉ. गोस्वामी यांचा हा दावा खरा ठरला, तर हा या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट असू शकतो.