धक्कादायक! केदारनाथ मंदिरातील १४.३८ कोटींचं सोनं बनलं पितळ, पुरोहितांचा खुलासा

0
333

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – उत्तराखंडमधील हिंदुंच पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथ येथील मुख्य मंदिराच्या गर्भगृहामधील भिंतींना बसवण्यात आलेल्या सोन्याचा पत्रा हा पितळ धातूमध्ये बदलला असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ पुरोहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी हा आरोप केला आहे. तसेच या प्रकाराविरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून याचे काय पडसाद उमटणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

नेमके काय आहे प्रकरण…
मुंबईतील एका व्यापाऱ्यानं केदारनाथ मंदिराला २३० किलो सोनं दान केलं होतं. या सोन्यातून मंदिराच्या गर्भगृहातील भिंती या सोन्याच्या पत्र्यानं मढवण्यात आला होता. या सोन्याच्या पत्र्यावरुनच आता मोठा वाद निर्माण झाला आहे. केदारनाथच्या पुरोहितांनी सोन्याच्या या लेअरवरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

संतोष त्रिवेदी यांनी बीकेटीसीवर गंभीर आरोप केले आहेत. (New Delhi News ) त्यांनी म्हटलं की, मंदिराच्या गर्भगृहातील सोनं हे पितळात बदललं आहे. सोन्याचे हे लेअर लावण्यासाठी अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळं मुख्य पुरोहित संतोष त्रिवेदी यांनी इशारा दिला आहे की, आरोपींच्याविरोधात तात्काळ कारवाई केली नाही तर मोठं आंदोलन उभारण्यात येईल.

दरम्यान, बदरी-केदार मंदिर समितीनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. संतोष त्रिवेदींचे आरोप भ्रम निर्माण करणारे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समितीचे सदस्य आर. सी. तिवारी यांनी सांगितलं की, याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. (New Delhi News ) यामध्ये हे सोन सुमारे एक अब्ज रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये तथ्थे न तपासचा भ्रामक माहिती दिली जात आहे.

मंदिराच्या गर्भगृहात लावलेलं सोन हे २३,७७७.८०० ग्रॅम आहे. ज्याची किंमत १४.३८ कोटी रुपये आहे. तसेच तांब्याच्या प्लेट्सवर सुवर्णजडीत काम करण्यासाठी १,००१.३०० ग्रॅम आहे. याची किंमत २९ लाख रुपये आहे. त्यामुळं अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा खोटा आहे. (New Delhi News ) त्यामुळेच ही भ्रामक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात समितीकडून कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.