धक्कादायक! आईने गळफास घेतला, पाण्याच्या बॅरेलमध्ये दोन छोट्या बाळांची प्रेतं तरंगताना दिसली

0
2

धाराशिव, दि. 26 (पीसीबी) : धाराशिव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने घरातील पत्र्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्हीही लहान मुलांचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. ही घटना 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. राधिका घट्टे  मृत महिलेचे नाव आहे. तर श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी या बाळांची नावे असून अवघ्या काही महिन्यांची ही लहानगी होती.

ही घटना उघडकीस आली त्यावेळी दोन छोट्या बाळांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. तसेच या दोन्ही बाळांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. एकाच घरातील तिघांच्या मृत्यूने परिसरात गोंधळाचे वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे 25 वर्षीय महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तसेच घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये दोन व पाच महिन्यांची तिची दोन्ही बाळांचे मृतदेह तरंगत होते. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

दरम्यान, घरातील पत्र्याच्या अडूला दोरीने गळफास घेत महिलेने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत महिलेच्या दिराने नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला व दोन्ही बाळांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरु आहे.