धक्कादायक…चार वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

0
655

दि २१ एप्रिल (पीसीबी )- स्क्रिजोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या ४ वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड भागात असलेल्या रीगालिया या उच्च – भ्रू सोसायटी मध्ये सकाळी ही घटना घडली.
कोमल जगदीश हरिश्चंद्र (वय ३२, रा. रिगालिया, सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. कोमल यांनी तिने इमारतीमधून उडी मारताना आपला चार वर्षांचा मुलगा विहान संकेत आवटे याला कडेवर घेऊन उडी मारली.

शनिवारी सकाळी साडे आठच्या पूर्वी ही घटना घडली आहे. कोमल यांच्यावर परदेशात तसेच भारतात सध्या उपचार सुरू होते. या प्रकारानंतर त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी पुरते हादरून गेले असून, याबाबत सायंकाळी उशिरा पर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.