द्रुतगती मार्गावर ट्रक चालकाला लुटले; सात जणांना अटक

0
284

शिरगाव, दि. ८ (पीसीबी) – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकाला सात जणांच्या टोळक्याने मारहाण करून लुटले. या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 3 जून रोजी पहाटे साडेचार वाजता घडली.

संकेत सर्जेराव कांबळे (वय 21, रा. पनवेल, जि. रायगड), अमोल संभाजी गोपाळे (वय 26, रा. शिरगाव, ता. मावळ), अक्षय राजू शेळके (वय 21, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), प्रकाश श्रीरंग साळुंके (वय 23, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), प्रिन्स लालजी यादव (वय 21, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), प्रसाद ज्ञानेश्वर कानगुडे (वय 19, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), राजा गंगाधर बाग (वय 21, रा. गणेशनगर, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुरेश नानूराम प्रजापती (वय 26, रा. राजस्थान) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रजापती हे ट्रक चालक आहेत. ते त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन 3 जून रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात होते. उर्से टोल नाक्याजवळ पेट्रोल पंपाच्या समोर त्यांनी त्यांचा ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवला आणि ते लघुशंकेसाठी गेले. त्यावेळी आरोपींनी प्रजापती यांना काठीने मारहाण केली. तिघांनी शिवीगाळ करून हाताने, बुक्क्याने मारहाण करून सोन्याची बाळी, एक मोबाईल फोन, घड्याळ आणि लेदर पाकीट असा एकूण 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरटे पळून गेले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.