द्रुतगती मार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
76

दि. ३१ जुलै (पीसीबी) देहूरोड,
द्रुतगती मार्गावर दुचाकीला परवानगी नाही. असे असतानाही द्रुतगती मार्गावर दुचाकी नेऊन ती ट्रकला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास देहूरोड एक्झीट जवळ घडली.

तपस विश्वास (वय 31, रा. साईनगर, मामुर्डी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून त्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार प्रफुल्न विनायक पाटील यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर दुचाकीला परवानगी नसतानाही आरोपी तपन याने देहुरोड एक्झिट येथे विरूद्ध दिशेने दुचाकी चालवून महामार्गावर ट्रक (एनएल 01 एबी 2708) याला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तपन याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.