दोन वर्षांच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

0
351

 लोणावळा, दि. १९ (पीसीबी): दोन वर्षांच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेवर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवबा पवार असे या मयत झालेल्या चिमुरड्याच नाव आहे.

नाशिकचे कुटुंब मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात एका खासगी रिसॉर्टवर आले होते. स्विमिंग पुलाजवळ हा चिमुकला खेळत असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट पाण्यात पडला. मात्र, घरातील सर्व आनंद साजरा करण्यात व्यस्त होते. या दरम्यान या मुलाला वाचवण्यासाठी कोणीच आले नसल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
शिवबा दिसत नसल्याने आई-वडीलांनी शोधाशोध सुरु केली. स्विमिंग पाण्यात मृतदेह दिसून आला. या घटनेमुळे संपूर्ण कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा सीसीटीव्हीही आता समोर आला आहे.
दरम्यान, लहान मुलं खेळत असताना त्याच्याकडे लक्ष द्या, असे वारंवार सांगण्यात येते मात्र, मुलांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे विपरित परिणाम होतात.