दोन रणरागीणी सुलभा उबाळे, सिमा सावळे पुन्हा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

0
237

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ज्यांनी कारकिर्द गाजवली त्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभाताई उबाळे यांचा वाढदिवस वृक्षारोपन, अन्नदान, धान्यवाटप तसेच जेष्ठ नागरिक संघाला मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांनी पार पडला. शहरातील जवळपास सर्वच राजकिय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, महापालिकेतील अधिकारी- कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून सौ. उबाळे यांना त्यांच्या यमुनानगर येथील निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या. हा वाढदिवस खऱ्या अर्थाने चर्चेला आला तो, सुलभा उबाळे आणि सिमा सावळे या दोन रणरागीणींच्या भेटीमुळे. सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात या दोघींनी शहर दनाणून सोडले होते त्याच पुन्हा एकत्र आल्याने अनेकांचे धाबे दणानले आहेत.

प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेचे शरद इनामदार यांच्यासह सिमा सावळे, आशा शेंडगे, वैभवी घोडके, अनिता तुतारे, रजनी वाघ, मीन यादव, शुभांगी बोराडे, आशाताई भालेकर, राहुल कलाटे, विविध पक्षांचे पदाधिकारी, मनपा अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

सौ. उबाळे यांनी तीन टर्म नगरसेविका म्हणून काम केले. भोसरी विधानसभेसाठी २००९ आणि पुन्हा २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेची उमेदवारी केली. अवघ्या १२०० मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला, पण त्या डगमगल्या नाहित. यमुनानगर महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. शिवसेनेच्या शहर पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख तसेच मतदारसंघात निरिक्षक म्हणूनही त्या सक्रीय राहिल्या. ठाकरे कुटुंबाशी अत्यंत निष्ठांवतांपैकी अशी उबाळे यांची ख्याती असल्याने शिवसेनेते फूट पडल्यानंतरही त्या डगमगल्या नाहीत. तसेच दुसरीकडे सिमा सावळे यासुध्दा भ्रष्टाचार विरोधातील आघाडीच्या नगरसेविका म्हणून तीन टर्म कार्यरत आहेत. महिपालिकेत भाजपची सत्ता येताच स्थायी समिती अध्यक्षपदावर त्यांना संधी मिळाली. सत्तेत असूनही त्यांनी भ्रष्टाचाराची असंख्य प्रकऱणे चव्हाट्यावर आणली. शहरातील या दोन महिला नेत्यांचे एकत्र येणे हे भोसरी, पिंपरीच्या आमदारांना धडकी भरवणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघी पुन्हा एकत्र आल्याने आगामी राजकीय समिकरणासाठी ते महत्वाचे समजले जाते.