दोन महिला पोलिस अधिकारीसुध्दा खरातच्या शिकार

0
2

दि.०७(पीसीबी)- अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, अशी सूत्रांची माहिती आहे.
अशोक खरातच्या संपर्कात एक डिसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी अशोक खरात यांच्याकडे धाव घेतली होती का?, असा सवाल उपस्थित होत आहे. अशोक खरातसोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता आहे.

महिलांचं लैंगिक शोषण केल्याची कबुली अशोक खरातने केली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचं समोर आलं आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे. चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसंच शोषण केल्याची अशोक खरातने कबुल केल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचं अशोक खरातने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे.