दोन महिलांना मारहाण ; एकास अटक

0
476

मोशी, दि. ५ (पीसीबी) – टेम्पोच्या भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना 30 जून रोजी रात्री सव्वाआठ वाजता बोराटेवाडी मोशी येथे घडली.

बिपीनकुमार श्रीयशपाल सिंह (वय 25), हिमांशुकुमार श्रीयशपाल सिंह (वय 19, दोघे रा. बोराडेवाडी, मोशी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत जखमी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 4) फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि त्यांची आई असे आरोपी बिपीनकुमार यांच्याकडे टेम्पो भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात टेम्पो भाड्याच्या हिशोबावरून वाद झाला. त्यातून ओरपी हिमांशुकुमार याने कसल्यातरी हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करून हाताने मारून ढकलून दिले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.