दोन भावांमध्ये हाणामारी

0
136

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) हिंजवडी
किरकोळ कारणावरून दोन भावांमध्ये हाणामारी झाली. ही घटना पारखी वस्ती, सुसगाव येथे 16 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

संतोष रामभाऊ गरड (वय 35, रा. पारखी वस्ती, सुसगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा भाऊ अंकुश रामभाऊ गरड आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकुश याने तू माझया बायकोला शिवीगाळ का करतो, अशी विचारणा करीत शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जखमी केले. महिला आरोपी हिने देखील शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.