दोन पिकअपची धडक; एक जण गंभीर जखमी

0
3

आळंदी, दि. 18 (पीसीबी)
दोन पिकअपची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. १६) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू या गावात घडली.
मारूफ मकबूल खान (वय 25, रा. चाकण तळेगाव रोड, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दुसरा पिकअप एमएच १२ एसएफ 9000 वरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान हे आपल्या पिकअप घेऊन आळंदी मार्गे लोणीकंद, रांजणगाव येथे चालले होते. त्यावेळी मरकळ कडून आळंदीकडे जाणारा पिकअप हा भरधाव वेगात आला. त्याने फिर्यादी यांच्या पिकअपला जोरदार धडक दिली. यामध्ये मारूफ खान हे गंभीर जखमी झाले. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.