दोन दुचाकींच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू

0
201

खेड, दि. २२ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणाऱ्या एका दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २०) रात्री खेड तालुक्यातील खालूंब्रे गावात घडली.

मयूर मारुती बोंबले (वय २८, रा. येलवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी घनशाम बाळासाहेब गाडे (वय ३५, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बळीराम शिवाजी देवकाते (रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडे यांचे मेहुणे मयूर बोंबले हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरून बळीराम देवकाते हा पल्सर दुचाकीवरून वेगात आला. त्याने समोरून मयूर यांच्या दुचाकीस जोरात धडक दिली. त्यात मयूर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.