दोन दुचाकींच्‍या अपघातात एकाचा मृत्‍यू, चौघेजण जखमी

0
113

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – दोन दुचाकींच्‍या अपघातात एकाचा मृत्‍यू झाला तर चारजण जखमी झाले. ही घटना १२ ऑगस्‍ट रोजी मध्‍यरात्री बारा वाजताच्‍या सुमारास घडली.


पोलीस हवालदार अशोक अश्रुबा जायभाये यांनी रविवारी (दि. ८) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिय्राद दिली आहे. पोलिसांनी दुचाकी चालक अंकित कुमार नोपाराम जाट (वय २०, रा. जाधववाडी, चिखली) आणि सुनील बेरुआ (वय ३०, रा. गायकवाड वस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १२ ऑगस्‍ट रोजी मध्‍यरात्री ११.५५ वाजताच्‍या सुमारास अंकीत शर्मा (वय २१), सुरेंद्र इंदल कुमार (वय ३४), व मयत अंकीतकुमार जाट हे ट्रिपलसीट चाकणकडून भोसरीच्‍य दिशेनेयेत होते. त्यांच्‍या समोरुन हॉटेल क्राऊन इंपेरीयल कडून रॉंग साइडने येणारी (एमएच १४ जे स ४०९०) वरील दुचाकी चालक सुनील बेरूआ याने दुचाकी भरधाव वेगाने रॉंग साइटने चालवुन धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत होऊन दुचाकी चालक अंकितकुमार जाट याचा मृत्‍यू झाला. तसेच दुचाकीच्‍या मागे बसलेले सुरेद्र इंदल कुमार (वय ३४), व अंकितकुमार शर्मा या दोघास गंभीर दुखापत झाली. तसेच (एमएच १४ जेएस ४०९०) यावरील चालक व त्याचे पाठीमागे बसलेली महिला यांनाही गंभीर दुखापत होऊन वाहनाचे नुकसान झाले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.