दोन दुचाकींची समोरासमोर धडक

0
24

एकजण गंभीर जखमी

चिंचवड,दि. 30 (पीसीबी)
चिंचवड मधील वाल्हेकरवाडी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना २५ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली.

चंद्रकांत विश्वनाथ माने (वय २६, रा. देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच २४/बीयु ३००१) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने हे त्यांच्या दुचाकीवरून वाल्हेकरवाडी रोडने देहूरोड येथे घरी जात होते. रसिकलाल धारिवाल शाळेजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात माने यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.