दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू

0
313

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) : दोन दुचाकींची समोरासमोर जोरात धडक झाली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात १३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हिंजवडी फेज तीन येथे घडला.

कैलास रामचंद्र ओझरकर (वय ४५, रा. रिहे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच १२/युटी ८४३९ या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १९ वर्षीय मुलगा हिंजवडी फेज तीन येथून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने समोरून आलेल्या एका दुचाकीने फिर्यादी यांच्या मुलाच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या मुलाच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी दुचाकीस्वार घटनेची माहिती न देता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.