दोन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक

0
122

दि२६ एप्रिल (पीसीबी ) – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना गुन्हे शाखा युनिट दोनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये शस्त्रासह अटक केली. या कारवाया गुरुवारी (दि. २५) भीमनगर, पिंपरी आणि आंबेडकर चौक, पिंपरी येथे करण्यात आल्या.

आदित्य राम सुर्वे (वय २०, रा. भीमनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी मुंढे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य सुर्वे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्यांचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. त्याने स्वतःकडे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली.

दुसऱ्या कारवाईमध्ये दत्ता संतोष धोत्रे (वय २१, रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी मुंढे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता धोत्रे याला देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतःकडे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला कोयत्यासह अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.