दोन ग्राहकांना हॉटेलमध्‍ये मारहाण

0
9
crime

बावधन, दि. २7 (पीसीबी) 
हॉटेलमध्‍ये ऑर्डर बदलण्‍याच्‍या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्‍ये घडली.

अर्थव मनोहर दगडे (वय २१, रा. पाटीलनगर, बावधन, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सेंदूर सरवाना भवन हॉटेलमधील दोन जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी अर्थव आणि त्‍यांचा मित्र असे दोघेजण बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्‍ये नाष्‍टा करण्‍यासाठी गेले होते. तिथे ऑर्डर बदलण्‍याच्‍या कारणावरून शाब्‍दीक बाचाबाची झाली. त्‍यावेळी हॉटेलमधील दोघांनी फिर्यादी व त्यांच्‍या मित्राला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्‍यानंतर जवळ पडलेल्या फावड्यानेही मारहाण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादी अर्थव यांच्‍या डाव्या कानाच्या पाठीमागील बाजूस, कानास व डाव्या हाताचे अंगठ्यास मार लागला आहे. तसेच फिर्यादी यांचे सोबत असलेल्या मित्रास सुध्दा मारहाणीमध्ये मार लागला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.