दोन कोटींच्या मशीनची परस्पर विक्री

0
223

चाकण, दि. २२ (पीसीबी) – शेडमध्ये ठेवलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या २१ मशीन मालकाच्या परस्पर विकून विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला. खेड तालुक्यातील खराबवाडी येथे टच ईलॅस्टिक्स या कंपनीत ३१ नोव्हेंबर २०२२ ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला.

प्रसनजीत शीतलचंद्र दास (वय ४८, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश संभाजी माळी (रा. शिवाजीनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दास यांनी त्यांच्या कंपनीतील सुमारे दोन कोटी रुपयांच्या २१ मशीन गणेश माळी याच्या शेडमध्ये ३१ नोव्हेंबर २०२२ रोजी ठेवल्या होत्या. काही दिवसांनी दास हे त्यांच्या मशीन पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या माशी शेडच्या बाहेर ताडपत्रीने झाकलेल्या दिसल्या. त्यानंतर काही दिवसांनी दास मशीन पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या मशीन शेडमध्ये अथवा परिसरात दिल्या नाहीत. माळी याने दास यांच्या परस्पर सुमारे दोन कोटी रुपयांच्या २१ मशीन विकून विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.