देहू नगरपंचायत कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

0
68

आळंदी, दि. 04 (पीसीबी) : देहू नगरपंचायतच्या वतीने शासनाचे निर्देश प्रमाणे ३ डिसेंबर २०२४ हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिव्यांग बांधवांसाठी विविध कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमात दिपप्रज्वलन व श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्षाहार अर्पण करीत पूजन देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पुजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी दिव्यांग दिना निमित्त मार्गदर्शन करीत देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ३ डिसेंबर जागतिक अपंग दिवस १९९२ मध्ये पहिला ‘ दिव्यांग दिन’ साजरा झाला होता. आज जगातली दहा टक्के लोकसंख्या विविध कारणाने दिव्यांग आहेत. जागतिक आरोग्य संघटना देखील दिव्यांग बांधवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून कार्यरत आहे. त्यासाठी विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध प्रचार, प्रसार उपक्रम या साठी राबविले जात आहेत. याच उपक्रम अंतर्गत विविध सेवा सुविधा देण्यास देहू नगरपंचायत बांधील आहे. यावेळी देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पुजा दिवटे यांनी संवाद साधताना दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ यातील तरतुदी प्रमाणे दिव्यांगां साठी विविध योजना व सवलती राबविणेचे सूचना आदेश आहेत.

यात अनेक तरतुद करून राज्य शासनाचे सूचना, निर्णया प्रमाणे पंचायत राज संस्थांनी त्यांचे स्वउत्पन्नातून ५ टक्के निधी राखीव ठेवून दिव्यांग कल्याणकारी योजना असून त्या प्रमाणे खर्चा संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार सदरचा निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे नगरपंचायतीस देखील बंधनकारक आहे. दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार देहू शहरात देखील मागील वर्षी ८२ दिव्यांगांची नोंदणी देहू नगरपंचायतीकडे झालेली आहे. उर्वरित नाव नोंदणीसाठी यु.डी.आय. डी. प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, आयडेंन्टीटी साईज फोटो आदी कागदपत्रे लाभार्थीनी यांनी दिल्यास त्यांना देखील योजनांचा लाभ मिळेल. या प्रसंगी सभापती मयूर शिवशरण, नगरसेवक योगेश काळोखे, नगरसेविका ज्योतीताई टिळेकर, कर विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष प्रियंका कदम, आस्थापना विभागाचे प्रमुख रामदास भांगे, विभाग प्रमुख अक्षय रोकडे, सजू घोडफोडे यांचेसह नगरपरिषद विभाग प्रमुख, कर्मचारी, देहू ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.