देहू गट संघचालक नरेश गुप्ता यांना मातृशोक

0
70

निगडी, दि. ३० जुलै (पीसीबी) -निगडी प्राधिकरण येथील जेष्ठ नागरिक सरस्वती देवी जोहरीमल गुप्ता (वय वर्षे ८७) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि.२९ रोजी पहाटे निधन झाले.

त्यांचे पश्चात देहूरोड बाजारातील प्रतिष्ठित व्यापारी राजकुमार, अमरनाथ तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देहू भागाचे संघचालक नरेश गुप्ता हे ३ मुले, २ मुली, सूना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर निगडी स्मशानभूमीत दि.२९ रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी विधानपरिषद सदस्य आ.अमित गोरखे, जिल्हा संघचालक विनोद बन्सल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य कैलास पानसरे, सावरकर मंडळाचे राजेंद्र देशपांडे, स्व.दत्तोपंत म्हसकर संस्थेतर्फे प्रदीप पवार यांचे सह संघाचे प्रमुख कार्यकर्ते, स्वयंसेवक, सामाजिक संस्था तसेच भाजपा कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, देहूरोड परिसरातील व्यापारी, नागरिक यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.