देहूरोड येथे पाकीट चोरट्यास अटक

0
240

देहूरोड, दि. १७ (पीसीबी) – भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे पाकीट जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. 16) सकाळी सवाना ब्रिज, देहूरोड येथे घडली.

राजेंद्र दत्तात्रय चव्हाण (वय 38, रा. भोंडवे वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश काकासाहेब काकडे (वय 24, रा. किवळे) या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसोबत भाजीपाला घेण्यासाठी जात असताना सवाना ब्रिजखाली देहूरोड येथे गेले. त्यावेळी सतीश काकडे याने फिर्यादी यांना धक्का मारून त्यांच्या खिशातून पाकीट जबरदस्तीने चोरून नेले. त्यात अडीच हजार रुपये रोख रक्कम होती. फिर्यादी यांनी लोकांच्या मदतीने चोरट्याला पकडले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.